14-07-2019 - 14-07-2019

Our club runs a number of projects throughout the year. Among them Mahadan is the great concept that is encouraging at the beginning of the year.. आम्ही आमच्या रोटरी क्लब हेरिटेज तर्फे वर्षभर अनेक प्रकल्प राबवीत असतो. त्यापैकी वर्षाच्या सुरुवातीला उत्साह देणारा दरवर्षी चालविण्यात येणारा महाप्रकल्प म्हणजे महादान.. दान म्हणजे देण्याची क्रिया.. पण जेव्हा आपण एखाद्या वस्तुचे दान गरजवंताला देतो तेव्हा त्याचे स्वरूप भिन्न आणि समाधानकारक ठरते. स्वतः साठी तर आपण नेहमीच जगतो..जरा दुसऱ्यांसाठी पण जगुन बघुयात..स्वतःवर तर बराच खर्च करतो जरा इतरांसाठीही थोडा करूयात..नि महत्वाचं स्वतःला वस्तू घेतांना आपण त्या नीटनेटक्या उपयोगी असलेल्याच घेतो तेव्हा हाच विचार दान देतानाही नक्कीच करूयात..आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हा विचार करून आम्ही एक सकारात्मक पाऊल उचललेलं आहे. त्यासाठी रविवार 14 जुलै हा दिवस सत्कारणी लावणार आहोत.. आपल्या ह्या महादानाला महासंख्येने उपस्थित राहून त्याला भव्य स्वरूप देऊयात.. रद्दी खेळणी रक्तदान अन्नदान नि वस्त्रदान..सगळ्यांनी भरभरून करूया या सगळ्याचे महादान..

Project Details

Start Date 14-07-2019
End Date 14-07-2019
Project Cost 133000
Rotary Volunteer Hours 9
No of direct Beneficiaries 600
Partner Clubs -
Non Rotary Partners -
Project Category Others